आरोग्य शिबिर वेळोवेळी घ्यावे - डॉ. एम. के. इनामदार.
वडापुरीत कै. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
वडापुरीतील गवळी परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिरातून केली ६० रुग्णांची आरोग्य तपासणी तर ६५ रुग्णांची नेत्र तपासणी.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी येथील कै. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गवळी परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन (दि.२ एप्रिल) करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ एम. के. इनामदार यांनी या शिबिराप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, छायाताई गवळी या आमच्या खूप ओळखीच्या होत्या. कोरोना काळातील पडजळीने त्यांचे निधन झाले .ते अतिशय दुःखदायक होते. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे त्यामुळे या शिबिरातून प्राथमिक अवस्थेतील रुग्ण सापडतील. प्राथमिक अवस्थेत सापडलेल्या रुग्णावरती योग्य उपचार होऊन त्यांचे पुढचे आयुष्य सुखकर होते. त्यामुळे अशी आरोग्य शिबिरे वेळोवेळी घ्यावी असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
वडापुरी( ता. इंदापूर) येथील गवळी कुटुंबीयांनी कै. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून ६५ रुग्णांची नेत्र तपासणी तर ६० रुग्णांची आरोग्य तपासणी केली.
तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील शिवचरित्रकार ह. भ. प. अमोल महाराज सूळ यांचे सुश्राव्य असे कीर्तन व अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थिती दर्शवून कै. छाया ब्रह्मदेव गवळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी डॉक्टर कसबे, के.के. बुधरानी हॉस्पिटल स्टाफ, ह .भ. प .अमोल महाराज सूळ .महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक ह. भ. प .चंदू महाराज पांचाळ, लोकसेवा गणपतराव आवटे फाउंडेशन चे अध्यक्ष सागर आवटे ,गोरख भोसले, इंदापूर क्रिटी केअर मेडिकल स्टाफ, नेत्र तपासणी स्टाफ, श्रीनाथ भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ व गवळी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

