सणसर येथे राजवर्धन पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला केले अभिवादन .
सणसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी होत आहे.आज इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने युवा नेते राजवर्धन पाटील यांनी महामानवास अभिवादन केले.
अभिवादन करताना आपल्या भाषणात म्हणाले की," सणसर करांनी अतिशय उत्तम अशी जयंती साजरी करण्याची तयारी केली असून अशीच प्रकारची जयंती इंदापूर तालुक्यात ठीक ठिकाणच्या गावामध्ये करण्यात येत आहे. कोरोना काळानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इंदापूर तालुक्यात उत्साहात साजरी होत आहे. अशा या महामानवाची जयंती आज आपण सणसर येथे मोठ्या उत्साहात साजरी करत आहात याचा आनंद वाटत आहे.मिरवणूकही अशाच पद्धतीने शांततेतच पार पाडा" अशी विनंतीही यावेळी राजवर्धन पाटील यांनी भीमसैनिकांना दिली. यावेळी सणसर पंचक्रोशीतील असंख्य युवक हजर होते.

