इंदापूर प्रतिनिधी: पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी पिटकेश्वर चेअरमन पदी नामदेव सर्जेराव किरकत यांची बिनविरोध (ता.१९ एप्रिल) निवड झाली.
इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी गोविंद दत्तू कांबळे हे होते. ठरलेल्या कालावधीनुसार त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला व त्यानंतर दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंध कार्यालयातील सहकारी हाराळ साहेब यांनी नवीन चेअरमन निवड प्रक्रिया पार पाडली. यामध्ये नामदेव सर्जेराव किरकर यांची सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड केली.
यावेळी सोसायटीचे संचालक कैलास येरळकर, पोपट येरळकर, मधुकर पोळ, अजित जाधव, दत्तात्रेय बोबडे, गोविंद कांबळे, विकास भोंग, अशोक जाधव, उमेश मोरे, राहुल भिसे ,सौ आशा किरकत ,सौ उषा येरळकर, इत्यादी उपस्थित होते. सचिव इनुस शेख , क्लार्क दीपक गोरे उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सोसायटीचे चेअरमन नामदेव किरकत यांचा सत्कार निमगाव केतकीचे
माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय चांदणे यांनी केला.
.

