गौराईमळा शाळेत भारतरत्न डॅा . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी : आज जिल्हा परिषद प्राथ शाळा गौराईमळा शेळगाव या ठिकाणी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रथम डाॅ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन ग्रामपंचायत सदस्या सौ प्रियांका ताई जाधव व शा. व्य. समिती अध्यक्ष विलास शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी प्रास्तविक करुन बाबासाहेब यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा सांगुन त्यांचा जीवनरथ सांगुन त्यांनी भारतीय राज्यघटना तयार करुन जगाला आदर्श लोकशाही राज्य घटना प्रधान केली अशा या महामानवाला त्रिवार अभिवादन करण्यात आले. वेळी मुलामुलींची भाषणे झाली तसेच या वेळी भिमशक्ती तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने निबंध रांगोळी चित्रकला व वक्तृत्व या स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या वेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थितीत होते
या वेळी अरुण जाधव सर भाऊराव जाधव शामराव जाधव अमोल जाधव नंदकुमार जाधव विशाल जाधव विवेक जाधव धीरज जाधव मल्हारी जाधव अंगणवाडी सेविका सुनिता जाधव मदतनीस कल्पना जाधव उपस्थितीत होत्या शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्याात आली

