सर्व भीम प्रेमींनी मिरवणुकीत सहभागी व्हावे - सनीभैय्या खरारे
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १४ / विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि . १४ एप्रिल रोजी भिंगार शहर येथे काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देण्यात यावा यासाठी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे वतीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते .
सदर निवेदनास मेहरबान पोलिस अधिक्षक साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन मिरवणुक मार्गावर सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत . यामुळे भिंगार येथील १४ एप्रिल च्या मिरवणुकीवर आता सी सी टीव्ही ची नजर रहाणार आहे . तसेच मोठा पोलिस बंदोबस्तही मिरवणुकीत लक्ष ठेवणार आहे .
यामुळे समाज कंटाकांवर नजर रहाणार असून सर्व भिम प्रेमी यांनी या मिरवणुकीत सहभाग घ्यावा असे अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे यांनी सांगितले .

