shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठा या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न

कौठा : १२ /   कौठा ग्रामस्थ व पिरॅमिड हॉस्पिटल दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग निदान व आरोग्य शिबीर आज ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी ९ ते १२ या कालावधीत संपन्न झाले .

यामध्ये पिरॅमिड हॉस्पिटल चे मधुमेह, फुफ्फुस,हृदयविकार तज्ञ *डॉक्टर महेंद्र पाटील सर* यांनी ग्रामदैवत *श्री भैरवनाथ महाराजांना नारळ* वाढवून शिबिराचे उद्घघाटन केले कौठा गावचे प्रथम नागरिक *सरपंच मोरे अण्णा* यांनी कौठा ग्रामस्थांच्या वतीने *डॉक्टर महेंद्र पाटील सर यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान केला* त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले *श्री चव्हाण साहेब यांचा सन्मान विद्यमान सदस्य व श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नितीनजी थोरात यांनी केला* आलेल्या संपूर्ण टीमचा सन्मान *माजी सदस्य प्रकाश आप्पा व सुनीलराव बागल* यांनी केला शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक व महिला भगिनींनी सहभाग नोंदवून शिबिरात तपासणी करून घेतल्या शिबिरामध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन करत असताना डॉक्टर पाटील म्हणाले की निरोगी शरीर हेच यशाची गुरुकिल्ली आहे ग्रामस्थांना या शिबिरासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन श्री डॉक्टर पाटील सर यांनी केले शिबिरासाठी *शिवव्याख्याते लक्ष्मण नायकवडी* व *श्री सुभाष परकाळे* यांनी योगदान दिले .

या शिबिरास *संतोषराव परकाळे सर,शिवाजी परकाळे,शुभम थोरात, गणेश मगर ,संचालक बंडू परकाळे, रमेश परकाळे आदी भालेराव सह श्रीराम देवस्थान चे अध्यक्ष श्री गणपतराव परकाळे अंकल  व संचालक व विद्यमान उपसरपंच श्री जीवनदादा शिपलकर* यांनी सहकार्य केले त्यामुळे आरोग्य शिबिर यशस्वी संपन्न झाले  पुन्हा एकदा आमच्या ज्ञात अज्ञात मित्रपरिवाराने शिबिरा सहकार्य केले त्यांचे मी शतश: ऋणी आहे आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते श्री लक्ष्मण नाईकवाडी यांनी केले तर आभार सुभाष परकाळे यांनी आभार मानले .
close