कुणाच्या मागे न जाता स्वतः नेतृत्व करा. - रंजन गिरमे
राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार.
महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी : दि ११ इंदापूर तालुका माळी परिषदेच्या वतीने व माळी समाज बांधवांनी एकत्र येत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची 196 जयंती दी सासवड शुगर फॅक्टरी चेअरमन रंजन गिरमे यांचे अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली यावेळी महात्मा फुले यांचे पुतळ्यास व महापुरुषांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
माळी परिषदेचे अध्यक्ष ॲड कृष्णाजी यादव यांनी प्रस्ताविक करून स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजन गिरमे यांनी युवकांना सांगितले कोणाच्या मागे न जाता स्वतः नेतृत्व करा. नक्की यशस्वी व्हाल. यावेळी राज्य लोकसेवा आयोमर्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले विकास व्यवहारे उपजिल्हाधिकारी , अमोल मोहिते सहा. आयुक्त राज्यकर , विशाल सातव सहा. अभियंता जलसंपदा , पुनम झगडे राज्य लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण , तेजस जाधव आयबीपीएस परीक्षेतून युनियन बँकेत एफओपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंकुश जाधव , पुनम झगडे , माणिक भोंग , संजय राऊत , संतोष राजगुरू , युवराज म्हस्के , अभंगताई , सरपंच प्रविण डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केली. शोभेच्या रथामधून महात्मा फुले यांचे पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आकर्षण विद्युत रोषणाई , फायर शोमुळे मिरवणूक आकर्षक झाली. युवक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रसंगी गणेश झगडे , दत्तात्रय शेंडे , देवराज जाधव , मच्छिंद्र चांदणे , माऊली बनकर , वसंत मोहोळकर , मोहन दुधाळ , छगन भोंगळे , बळी बोराटे , निवृत्ती गायकवाड , अशोक जाधव , मेहेर साहेब , ॲड समीर टिळेकर , बाबाजी भोंग , रामचंद्र हेगडे, किरण म्हेत्रे , संजय म्हस्के , शशिकांत शेंडे , संतोष गदादे , भारत ननवरे , शालनताई भोंग प्राजक्ता रासकर उपस्थित होते.
जयंती आयोजनासाठी शंकर नाना भोंग , माणिक भोंग , सुहास जाधव , अमोल जाधव , दादाराम शेंडे , गोरख आदलिंग , बबन खराडे , तुषार खराडे , राजू भोंग , संतोष घनवट , ॲड सुभाष भोंग , ॲड संदिप शेंडे , पत्रकार निलकंठ भोंग यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले. आभार राहुल जाधव यांनी मानले.

