shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समिती पुणे जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदी इंदापूर च्या सुनिल वाघ यांची तर सरचिटणीस पदी भोर च्या संदीप जगताप यांची बिनविरोध निवड

*शिक्षक समिती पुणे जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदी इंदापूर च्या सुनिल वाघ यांची तर सरचिटणीस पदी भोर च्या संदीप जगताप यांची बिनविरोध निवड.*
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक.१६ एप्रिल रोजी शिक्षक समिती पुणे जिल्हा शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन केडगाव चौफुला,तालुका-दौंड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले.प्रास्ताविक   नंदकुमार होळकर यांनी केले.या अधिवेशनामध्ये शिक्षक समिती पुणे जिल्हा या शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदी इंदापूर च्या सुनिल वाघ यांची तर सरचिटणीस पदी भोर च्या संदीप जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या कर्यक्रमास आमदार रविंद्र धंगेकर,माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे उपस्थित राहिले व त्यांनी शिक्षक समिती च्या कामाचे कौतुक करून नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा  देऊन आम्ही शिक्षक समिती च्या पाठिशी उभे राहू अशी ग्वाही दिली.त्यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य नेते उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
               सुनिल वाघ यांनी निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना म्हटले की शिक्षक समिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार,सर्वांना सोबत घेऊन शिक्षकांची जि प,पंचायत समिती,मंत्रालयीन स्तरावरील कामे मार्गी लावणार,शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत करणार,शिक्षकांच्या जुनी पेन्शन, वरीष्ठ वेतन त्रुटी सह अनेक प्रलंबीत मागण्यासाठी प्रसंगी आंदोलने, मोर्चे काढून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.शिक्षक समिती सभासदांना बरोबर घेऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार. शिक्षक समितीने संधी दिल्याने त्यांनी राज्य,जिल्हा नेते,सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकारणी,सभासद बंधू भगिनींचे आभार मानले.सदर कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.निवडीनंतर त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.कार्यक्रम स्थळी भोजनाची व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.अधिवेशनाचे सर्व नियोजन शिक्षक समिती दौंड च्या वतीने करण्यात आले.
close