shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समता फाऊंडेशनच्या माध्यमातून समता सेवकांच्या नियुक्त्या सुरु

अजिजभाई शेख - राहाता
श्रीरामपर - येथील राजकारण विरहित सर्व धर्मिय शासनमान्य नोंदणीकृत सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्यावतीने श्रीरामपूर शहर,तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यात समता सेवक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी दिली.


सामाजिक कार्यात रुची असलेल्या आणि समाजसेवेची आवड/इच्छा बाळगणाऱ्या सर्व जाती - धर्मातील मान्यवरांना यामध्ये सहभागी होता येणार असून सामाजातील अधिकाधिक सामाजाभिमुख कार्यांना गती मिळण्यासाठी समाजसेवेची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पुढाकार घ्यावा असेही म्हटले आहे.सोबत मोफत संगणक कोर्स,व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रत्येक समता सेवकास ओळखपत्रही दिले जाणार असून ज्यांना सामाजिक कामे करण्यात रुची आहे. अशा मान्यवरांनी त्वरित ॲड.मोहसिन एस.शेख - सचिव: समता फाऊंडेशन,समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट, कॉलेजरोड, श्रीरामपूर जि.अहमदनगर यांच्याशी संपर्क साधावा असेही शेवटी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

close