गुणवत्ते बाबत नेहमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरेवस्ती एक पाऊल पुढेच - अनिताताई खरात.
जि प शाळा साखरेवस्ती (खोरोची) येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: जि .प .शाळा साखरेवस्ती केंद्र रेडणी (ता-इंदापूर ) येथे शालेय स्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात १ली त दाखल होणाऱ्या बालकांचे विकास पत्र भरण्यात आले.शारिरीक विकास,बौद्धिक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी,पालकांना मार्गदर्शन अशा विविध प्रकारच्या स्टॉल ची निर्मिती करण्यात आली.
या मेळाव्याचे उद्धाटन तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात यांनी केले,या वेळी , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गणेश साखरे,मुख्याध्यापक जाधव सर, दिलीप वाघमोडे,आण्णा खरात, महादेव बिचकुले व इतर मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मल्लिकार्जुन वच्चे गुरुजी यांनी सांगितले की, अनिताताई आम्हाला नेहमीच सहकार्य करतात त्यांना आम्ही आमच्या समस्या हक्काने सांगतो आणि तेवढ्याच तत्परतेने त्या आम्हाला सर्व ठिकाणी सहकार्य करतात .
अध्यक्षीय भाषणात सौ अनिताताई खरात म्हणाल्या की ,क्षमतेवर आधारित खूप मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करून स्टाल चे उत्कृष्ट सादरीकरण शिक्षकांनी केले.विशेष म्हणजे गुणवत्ते बाबत नेहमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरे वस्ती एक पाऊल पुढेच असते. आणि आम्हाला श्री वच्चे गुरुजी , श्री जाधव गुरुजी यांच्या सारखे गुरुवर्य लाभले हे आमच्या साखरेवस्ती शाळेचे भाग्य अशा शब्दात आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांचे हस्ते मुलांना गुलाब पुष्प,फुगे,व रोपे देऊन स्वागत करण्यात आले.शेवटी अनिताताई खरात यांच्या हस्ते मुलाना खाऊ वाटप करून मेळाव्याचे सांगता करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब जाधव यांनी केले तर आभार मल्लिकार्जुन वच्चे यांनी मानले.

