संगमनेर - ५ मे रोजी जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने ' पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव ' आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मा. राज ठाकरे (सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांचे हस्ते ५ मे रोजी बालगंधर्व कला दालन पुणे येथे सकाळी १०वाजता होत आहे. या महोत्सवात संगमनेरचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांनी काढलेली व्यंगचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रीयन ६३, राज्यस्तरीय ४१ आणि परदेशीय २५६ असे एकूण ३६० व्यंगचित्रकारांनी सहभाग नोंदविला आहे.
या महोत्सवात परिसंवाद, चर्चा, प्रात्यक्षिक, व्यंगचित्र प्रदर्शन याचा समावेश आहे.
अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात समाविष्ट झालेले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून व्यंगचित्र चाहत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्टूनिष्ट कंबाइनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि युवा संवाद सामाजिक संघटनाचे अध्यक्ष धनराज गरड यांनी केले आहे.


.jpg)
