shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन.

इंदापूर शहर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन.

( गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण)
इंदापूर प्रतिनिधी :प्रतिवर्षानुसार श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने व आदेशानुसार अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित इंदापूर शहर केंद्र महतीनगर श्री स्वामीराज हॉटेलच्या समोर सोलापूर पुणे रोड येथे दिनांक १२ एप्रिल ते दिनांक १८ एप्रिल २३. दरम्यान आयोजित करण्यात आले असून या सप्ताह कालावधीत पाचवा वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण, नवनाथ भक्तिसार, सुलभ भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, हवनयुक्त गुरुचरित्र, अखंड प्रहरे यामध्ये सकाळी ८ ते  रात्री ८ या वेळेत महिला सेवेकरी व रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुरुष प्रहरे राहतील तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या नियोजनानुसार श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री स्वामी याग, श्री चंडीयाग, गीताई याग, रुद्र मल्हारी याग, दररोज नित्य स्वाहाकार, अब्ज चंडी अंतर्गत श्री स्वामी चरित्र सारामृत श्री दुर्गा सप्तशती पाठ, रुद्र आवर्तने औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी श्री विष्णुसहस्त्रनाम, गीतेचा १५ वा अध्याय, तुकारामाचा अभंग, पसायदान, मनाचे श्लोक, सांस्कृतिक कार्यक्रम या सप्ताह कालावधीत संपन्न होणार आहे. मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी श्री सत्यदत्त पूजन होऊन सकाळी १०:३०  वाजता सप्ताह सांगता महाआरती होईल नंतर मंदियाळी स्वरूपात महाप्रसाद वाटप होणार असून या सर्व सेवेत शहरातील सर्व भाविक भक्त  सेवेकऱ्यांनी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
close