shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सणसरमध्ये पुन्हा कालवा फुटल्याने शेतकरी आक्रमक

सणसरमध्ये पुन्हा कालवा फुटल्याने शेतकरी आक्रमक

 माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अधिका-यांना खडेबोल  
इंदापूर प्रतिनिधी : सणसर गावातील रायतेमळा परिसरामध्ये ३९-ब कालवा पुन्हा एकदा फुटल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ताबडतोब याठिकाणी धाव घेत परिसराची पाहणी केली आहे.
या कालव्याला गेल्याचे महिन्यात भगदाड पडून सणसर भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.हातातोंडाशी आलेली पिके संपुर्णपणे उध्दस्त झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा एकदा याच ठिकाणी कालवा फुटल्याने शेतकरी बांधव कमालीचे आक्रमक झाले असून जलसंपदा विभागाच्या कारभाराविषयी नारजी व्यक्त केली आहे. 
या घटनेची माहिती मिळताच आमदार दत्तात्रेय भरणे यांनी त्वरित सणसर परिसरामध्ये नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून‌ जलसंपदाच्या प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.या पाहणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार भरणे यांना घटनेची माहिती देताना सांगितले की, मागील पाच-सहा दिवसांपासून कालव्याला गळती लागली होती,याविषयी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी सातत्याने संपर्क साधत सदर गळती होत असलेल्या ठिकाणची तातडीची दुरूस्ती करण्याबाबत शेतकरी बांधव पाठपुरावा करत होते.परंतु प्रशासनाने याची कोणतेही दखल घेतली नसल्याने आज पुन्हा एकदा कालवा फुटला असल्याचे स्थानिकांनी सांगताच आमदार भरणे यांनी लागलीच जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.धोडपकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना चांगलेच खडसावले आहे.
आमदार भरणे म्हणाले की,गेल्याच महिन्यात या ठिकाणी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे,संसारपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीची मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली तर नाहीच परंतु जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याचे सांगत भरणे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.यादरम्यान आमदार भरणे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अक्षरशः रौद्ररूप रूप धारण केल्याने काही काळ उपस्थित नागरिक सुद्धा अवाक् झाले होते.
  शेवटी श्री भरणे यांनी नुकसान ग्रस्त भागाचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत मिळाली पाहीजे असा सज्जड दम सुद्धा अधिकाऱ्यांना भरला आहे.
एकूणच अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शेतक-यांचे नाहक नुकसान  झाल्याने आज आमदार भरणे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहेत.
close