shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिंगो जुगार अडड्यावर पोलिसांची कारवाई

एमआयडीसी पोलिस अॅक्टीव्ह मोड मधे

प्रतिनिधी : महेश चव्हाण

नगर: 7  / एमआयडीसी पोलिसांनी अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या  बिंगो नावाच्या हारजितीचा जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत एकूण 2,76,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . दि. ०४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना  गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ अ.नगर येथे पत्रा शेडमध्ये काही व्यक्ती बिंगो नावाचा हारजितीचा जुगार लोकांकडुन पैशे घेवून आकडयावर पैसे लावुन खेळत व खेळवित आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तात्काळ एक पथक तयार करुन 
 पो ना आंधळे, पो ना पांढरकर, पो कॉ सानप  यांचे पथकाने जावून छापा टाकला तसेच भोला वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ अ.नगर येथे एमआयडीसी पोलीस पथकाची खात्री होताच छापा टाकला असता उभे असलेले लोक पोलीस आल्याचे पाहुन पळुन गेले . बसलेला इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी जागीच पकडले व त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव दिपक निळकंठ घाटे वय ४० रा. नागापुर अ.नगर असे सांगीतले. त्याची झडती घेतली असता, त्याचे कब्जात बिंगो जुगाराचे साधने मिळुन आले .


यावेळी  १३८०/- रु रोख त्यात १००,२०,१० रु दराच्या चलनी नोटा तसेच २,६०,०००/००रू की.ची स्विफ्ट गाडी नं. एम एच १२ ई एम ८६९५ तसेच २००/०० रु की. चार एक ० ते ९ आकडे लिहलेला कागद तसेच १५,०००/०० रू की ची सनसुई कंपनीचा एल सी  डी  
२,७६,५८०/- रू एकुण हस्तगत करण्यात आले

पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी आरोपी दिपक घाटे यास स्विप्ट गाडी कोणाची आहे. याबाबत विचारपुस करीता त्याने सदर स्विप्ट गाडी हि मीच बिंगोची स्क्रीन व साहित्य आणने नेणे करीता वापरतो असे सांगीतले.वरिल वर्णनाच्या व किंमतीच्या मुदद्देमालासह आरोपी दिपक निळकंठ घाटे वय ४० रा. नागापुर अ.नगर हा मिळुन  आरोपी व मुददेमाल ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस  अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार पोना/पांढरकर, पोना/आंधळे,पोकॉ/ सानप आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली आहे.
close