shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहरात वीजेचा खेळखंडोबा थांबवा अन्यथा आंदोलन- जाफरभाई शहा



श्रीरामपूर प्रतिनिधी:
सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असुन यानिमित्ताने उपवास (रोजा) ठेवले जातात,शिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यावर लाईट नाही म्हटल्यावर अंगाची लाही लाही होते,मात्र महावितरण चे काही अधिकारी जाणीवपूर्वक वॉर्ड क्रमांक १.व २ ची वीज ऐनकेनप्रकारे घालवताना दिसुन येते आहे,
रमजान महिना सुरु  झाल्या पासून वीजेचा असा खेळ खंडोबा चालु आहे,लाईट कधीही जाते आणि कधीही येते,त्यावर शहरातील एकाच बाजुची लाईट जाते,वॉर्ड क्रमांक १ व २ याच साईटला नेहमी नेहमी का प्रॉब्लम होतो,येत्या २ ते ३ दिवसात रमजान ईद आहे रोजाच्या वेळी, नमाजच्या वेळी लाईट नसते, लाईट गेली की अधिकाऱ्यांचे फोन बंद होतात, लॅंडलाईन फोन देखील रिसिव्हर्स बाजुला ठेवून डेड करण्यात येतात.

 महावितरण कार्यालयात अशाप्रकारचा मनमानी कारभार थांबवून लाईट सुरळीत करावी अन्यथा येत्या २ दिवसात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा , युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जाफर शहा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर*
close