shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे झाले "विठू नामयाचा" नाट्य प्रयोग सादरीकरण

तेजस गायकवाड
श्रीरामपूर- नेवासा तालुक्यातील श्री देवगड संस्थान याठिकाणी,बालयोगी श्री सदानंद महाराज लिखित तथा संगीत दिग्दर्शित संत नामदेव महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा दोन अंकी नाटकाचा प्रयोग शनिवार दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत (श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड ता.नेवासा जि. अहमदनगर) श्री दत्त मंदिर संस्थान येथे मान्यवर रसिक श्रोत्यांच्य उपस्थितीत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला.


याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते विठू नामयाच्या या पुस्तकाचेही प्रकाशनही करण्यात आले. महाराजांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले व कलावंतांना शुभेच्छा व्यक्त केल्या, बालयोगी सदानंद महाराजांचे पूजन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले, या नाटकाचे दिग्दर्शक - श्री उपेंद्र दाते  हे असून निर्माते मनोज राऊत हे आहेत. या नाट्यप्रयोगाच्या आयोजनासाठी बालयोगी श्री सदानंद महाराज नाट्य मंडळ परशुराम कुंड तुंगारेश्वर पर्वत यांनी पुढाकार घेतलेला आहे. 

संत चरित्रावर आधारित साधूने लिखाण केलेले व आयोजक ही संत ही संत देवगड सारखी पवित्र भूमी, यामुळे या नाट्यप्रयोगाच्या वैभवात आणखीनच भर पडली.पंजाब प्रांतात घुमान येथे बालयोगी सदानंद महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता, त्या ठिकाणी या नाटकाचा पहिला प्रयोग संपन्न झाला व त्यास रशिक - श्रोत्यांचा उदंड असा प्रतिसाद लाभला.
नामदेव महाराजांच्या जीवन कार्यातील वेग वेगळे प्रसंग या नाटकामध्ये बघावयास मिळाले. 
भागवत धर्मामध्ये नामदेव महाराजांचे कार्य हे मोठे आहे. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे व भागवत धर्माची पताका नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत घेऊन जाणारे संत म्हणून नामदेव महाराज ख्यातकीर्त आहेत. संत परंपरेतील या संतांविषयी अध्यात्मपरंपरेतील साधकांना मोठी श्रद्धा आहे. व या श्रद्धेचा आदर करतच श्री दत्त मंदिर संस्थानचे महंत पूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी पुढाकार घेत या नाट्यप्रयोगाचे आयोजन श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे केले होते. या संगीत नाटकासाठी परमपूज्य सद्गुरु बालयोगी सदानंद जी महाराज, परमपूज्य भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, ह भ प कैलासगिरीजी महाराज, सुनीलगिरीजी महाराज, गणपत महाराज आहेर, रामनाथ महाराज पवार, लक्ष्मीनारायण जोंधळे, महाराज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, बाळासाहेब कानडे, गायक राम विधाते, बजरंग विधाते, तात्या शिंदे, नामदेव महाराज खंदारकर, प्रकाशानंदगिरीजी महाराजांचे माता - पिता,मातोश्री सरुबाई पेसोडे,चांगदेव साबळे, तेजस गायकवाड, दत्तात्रय महाराज शिंदे, सरपंच अजय साबळे, संदिप साबळे, योगेश जाधव, मनोज पवार, गणेश महाराज रणमले, महेश महाराज रिंधे, नारायण ससे,दिनकर महाराज मते.सर्व पूजनीय संत. महंत. महाराज मंडळी अध्यात्मपरंपरेवर प्रेम करणारी मंडळी. साधक. राजकीय. धार्मिक. क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close