shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महामानवं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त बेलापूर बु! मध्ये भव्य शोभा यात्रा

बेलापूर प्रतिनिधी:
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त बेलापूर बु! मध्ये विविध स्पर्धा व शोभा यात्रा मिरवणूक मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडल्या, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत ५१ मुले व मुलीनी सहभाग नोंदवीला,त्याचे बक्षीस वितरणही जयंती दिनी रविंद्र खटोड, भरत साळूंके, सुनिल मुथा, देविदास देसाई या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, गावातुन भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभा यात्रेत बेलापुर सेवा सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले, श्रीरामपूर पंचायत समिती मा. सदस्य व काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण पा. नाईक, जेटीएस शिक्षण संकुल बेलापूरचे चेअरमन राजेश खटोड , जनलक्ष्मी खटोड, पतसंस्थेचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य रवी खटोड, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच भरत साळुंके, माजी चेअरमन अनिल पा. नाईक, बंटी शेलार,सुरेश अमोलीक,संजय शेलार, सागर साळवे, मयूर खरात, योगेश अमोलिक, विजूय भिंगारदिवे, सनी खरात,अभिजित खरात, महेश अमोलिक, ईश्वर अमोलीक, संजय अमोलीक,विजय अमोलीक,जयेश अमोलीक, राजेश अमोलीक, नितीन खरात, राहुल तेलोरे, रॉनल अमोलीक, प्रतीक अमोलीक, राजू दांडगे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांनीही मिरवणूकीला भेट दिली.

बेलापूर गावातील अनेक, कार्यकर्ते व महिला माता- भगिनी मोठ्यांच्या संख्येने उपस्थित होत्या. ह्या अनोख्या मिरवणूकीने बेलापूर गाव दाणाणून गेले होते. सर्व समाजातील लोक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शोभा यात्रेत सहभागी झाले होते, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी शेवटी आभार मानले.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close