अजिजभाई शेख
राहाता - येथील तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसिलदार कुंदन हिरे यांची बदली झाली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या कार्यकुशलतेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राहाता तहसिल कार्यालयात ना भुतो ना भविष्य अशी त्यांची उज्वल कारकीर्द ठरली असुन जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जनसामान्यांसाठीच्या शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना त्यांच्यापर्यत कशा पोहोच होतील याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचे व आहे,बाहेर त्रस्त होऊन आपल्या कामानिमित्त तहसिल कार्यालयात आलेला मनुष्य हस्तमुखानेच परतत असे, तहसिल कार्यालयातील कधी कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामांत कुचराई केली नाही,कारण वरिष्ठांचे तसे आदेशा सोबत सर्वत्र कटाक्षाने लक्षच असायचे,अशा प्रकारे जनसामान्यांची कामे करताना राहाता तहसिल कार्यालय हे राज्यात नंबर वन म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे शिस्तबद्ध पद्धतीने या कार्यालयाची कामे चालतात याचे श्रेय जरी तहसीलदार श्री.हिरे स्वतः न घेता कर्मचाऱ्यांना देत असतील तर हे त्यांचे मोठेपण आहे,आणि यालाच मनाचा मोठेपणा असेही म्हणतात म्हणून यावेळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सा.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे संस्थापक शाह मुश्ताकअली म्हणाले की, यामागे राहाता तहसिल मध्ये अनेक तहसिलदार आले आणि गेले, यापुढे देखील अनेक येतील आणि जातील मात्र
तहसीलदार कुंदन हिरे साहेब हे सर्वांच्या लक्षात राहतील,असे त्यांची कामे असल्याने कोणासही वाटत नाही की श्री.हिरे साहेबांनी राहाता तहसिलमधून अन्यत्र बदलुन जावे,मात्र शासनाच्या नियमाप्रमाणे बदल्या या होणारच आणि होतच असतात,मात्र यापुढे जे कोणी याठिकाणी नविन तहसीलदार साहेब येतील त्यांचेही स्वागत आम्ही करुच,मात्र त्यांनी देखील श्री.कुंदन हिरे साहेबांसारखेच आपले कार्य आणि कामे सुव्यवस्थितपणे पार पाडण्याचा पुढाकार घ्यावा तथा श्री.हिरे साहेबांप्रमाणेच एक आदर्श अधिकारी होण्याचा बहुमान प्राप्त करावा असेही ते म्हणाले.
याप्रसंगी राहाता शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष श्री.नंदकुमार सदाफळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या,
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल राहाता शहराध्यक्ष गुलशेर शेख,दादासाहेब पठारे आदि मान्यवर उपस्थित होते.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

