shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरपीआयच्यावतीने सुतगीरणी फाट्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील सुतगीरणी फाट्यावर विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीदिनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा सरचिटणीस आरपीआय शाखा अध्यक्ष मनोज काळे यांच्यावतीने श्रीरामपूर येथील सुतगिरणी फाटा याठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवास विनम्र अभिवादन सभा यासोबतच सर्व समाज बांधवांना महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, लोकनियुक्त सरपंच सुनीलभाऊ शिरसाठ, अण्णासाहेब शरणागते गुरुजी, पत्रकार नंदकुमार बगाडे, बाबासाहेब मोरे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब दिघे म्हणाले की, या ठिकाणी खुप चांगल्या आणि सुंदर पद्धतीने स्तूत्य उपक्रम राबविण्यात आला असून असेच उपक्रम खरेतर विविध ठिकाणी राबवण्यात यावे, कारण महामानव जयंतीपर्व हे पंधरा दिवस चालणार असून या जयंतीपर्व निमित्ताने विविध सखमाजाभिभुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास सुतगिरणी फाटा येथील शाखा अध्यक्ष व त्यांचे मित्र मंडळ अतुल काळे,अमित काळे ,खालील व्यवहारे, समीर सय्यद, पप्पू शेख, अरुण पाटोळे, शिंपी काका,अनिल काळे, विनायकराव बोराडे, सचिन मेत्रे, आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन पत्रकार नंदकुमार बागडे यांनी केले.


*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close