केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई येथे
दोन दिवसीय दौरा.
इंदापूर प्रतिनिधी(मुंबई): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दोन दिवसीय दौऱ्याकरिता मुंबई येथे आगमन झाले. येथील विमानतळावर श्री. शाह यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. शाह यांच्या हस्ते रविवार १६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

