shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एसबीआय बँकेचा वसुली प्रतिनधीने दिली पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी..

वसुली करणारा म्हणतोय मी एका केंद्रीय मंत्र्यांचा राईट हॅन्ड अन तीन आमदार निवडून आणलेत

प्रकाश मुंडे  ! बीड जिल्हा प्रतिनिधी :- 

मी एका केंद्रीय राज्य मंत्र्यांचा राईट हॅन्ड असून केज मतदार संघात मी तीन आमदार निवडून आणले आहेत. असे म्हणून एसबीआय बँकेच्या वसुली प्रतिनिधीने केज येथील दै हिंद जागृती केज पत्रकार तथा मानव विकास संरक्षण समिती बीड जिल्हाध्यक्ष यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.


या बाबतची माहिती अशी की, दि. २२ एप्रिल रोजी पत्रकार दशरथ चवरे हे सोनिजवळा येथून केजनकडे येत असताना त्यांना त्यांच्या घरा जवळ एसबीआय बँकेचा वसुली प्रतिनिधी म्हणून काम करणारा अजय तांदळे याने  त्यांना थांबविले आणि म्हणाला की, तुमच्याकडे बँकेचे कर्ज आहे. तेव्हा दशरथ चवरे त्याला म्हणाले की, त्यांच्याकडे कोणत्याही बँकेचे थकीत कर्ज नाही. असे म्हणून त्यांना त्याचा परिचय विचारला असता तो म्हणाला की, त्याने केज मतदार संघात तीन आमदार निवडुन आणलेले आहेत. तसेच तुला माहीत आहे का, की, तो एका मंत्र्याचा राईट हॅन्ड आहे. तुला काय करायचे आहे ते कर. असे म्हणुन शिविगाळ केली आणि म्हणाला की, तुझ्या सारखंडे पत्रकार खुप पाहीले आहेत. तु नादी लागू नको. तुला केजला आल्यावर जिवे मारुन टाकीन. अशी जिवे मारण्याची धमकी दिली व निघुन गेला.

त्या नंतर पत्रकार दशरथ चवरे यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात त्या मंत्र्यांच्या कथित राईट हॅन्ड विरुद्ध पत्रकाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स,पो,नि,उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत 

------------------------------------------------------

*पत्रकारांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची भेट :-* या घटनेची माहिती मिळताच पत्रकार रामदास तपसे ,दत्तात्रय हंडिबाग, गौतम बचुटे, अजय भांगे, रमेश गुळभिले, महादेव दळवी,सनी शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली.
close