*शिक्षक समिती शिक्षकांचे विविध प्रश्नासाठी लवकरच आंदोलन करणार - नंदकुमार होळकर.
*शिक्षकांचे समस्या प्राधान्याने सोडवणार - नुतन जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ.*
*शिक्षक समिती नुतन पदाधिकारी यांचा निमगाव केतकी येथे सत्कार संपन्न.*
इंदापूर प्रतिनिधी: दि 22 संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे पुणे जिल्हा शिक्षक समितीचे नुतन जिल्हाध्यक्ष पदी सुनिल वाघ व सरचिटणीसपदी संदिप जगताप यांची निवड झाल्याबद्दल निमगाव केतकी बीट मधील शिक्षकांनी सत्कार केला. यावेळी मावळते अध्यक्ष नंदकुमार होळकर , ज्ञानदेव बागल प्रमुख उपस्थित होते.
नंदकुमार होळकर यांनी बोलताना संघटनेची वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. नुतन जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ यांनी सर्वांना बरोबर घेवून काम करणार असे सांगितले , सरचिटणीस संदीप जगताप यांनी जिल्हा स्तरावर सर्व प्रश्न मार्गी लावणार असे सांगितले.
सत्कार समारंभाचे प्रास्ताविक किरण म्हेत्रे यांनी केले यावेळी ज्ञानदेव बागल , संदीप कदम , उमेश सुपुते , शांताराम रणवरे , प्रभाकर लावंड , प्रतिभा जौंजाळ , दत्तात्रय लकडे , नितीन वाघमोडे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सुनिल कुंजीर , सुनिल कांबळे , अरूण मिरगणे , सुनिल शिंदे , विनय मखरे ,दिलीप अभंग , अतुल जौंजाळ , नंदकुमार सूर्यवंशी ,दिलीप पोळ , शिवाजी जाधव , राजेंद्र काळेल , नागेश जाधव , अजिनाथ आदलिंग , संतोष भोसले , राजू भोंग , सतेश भोंग , भुषण जौंजाळ , भारत शेंडे , प्रताप शिरसट , भारत ननवरे , दिलीप राऊत , योगेश पांढरे , राहुल लंबाते , सुरेश माने , नामदेव गुंड , गणेश सोलनकर , संजीवकुमार केसरे , विकास भुजबळ , किरण लंगोटे , संतोष चोरमले , सुनिल पवार , लालचंद खोमणे , विठ्ठल सोनटक्के रत्नमाला भोंग , संध्या जाधव , मंजुश्री धारूरकर सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले आभार बापूराव जाधव यांनी मानले.

