shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक कारखान्याच्या पेट्रोल पंपास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार प्राप्त

अशोकनगर प्रतिनिधी: 
अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक सहकारी साखर कारखान्याच्या श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपास सन २०२२-२३ या वर्षांमधील सर्वाधिक ऑइल विक्री केल्याबद्दल शिर्डी सेल्स एरिया (हायस्ट ल्युब व्हॉल्युम) 'परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड' म्हणजेच सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन औरंगाबाद विभागाचे डेप्यु. जनरल मॅनेजर लोकेश कुमार सिंघल,  विशाल शर्मा, सेल्स ऑफिसर अंकित पाठक यांचे हस्ते डिलर मिटींगमध्ये कारखान्याचे संचालक अमोल कोकणे, मॅनेजर (स्टोअर) विश्वनाथ लवांडे यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.

     हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने विभागनिहाय पेट्रोल, डिझेल व ऑइलच्या सर्वाधिक विक्रीसह उत्कृष्ट ग्राहक सेवा व सर्वंकष सरस कामगिरीसाठी दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी अशोक सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोल पंप शिर्डी विभागातून सदर पुरस्काराचा मानकरी ठरला.

       सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, मुळा-प्रवराचे संचालक श्री.सिध्दार्थ मुरकुटे, संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच संचालक मंडळाच्या सदस्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

वृतसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close