ग्रामीण भागात जे. के. क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातूनच खेळांचा प्रसार व प्रचार - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
जे. के. क्रीडा प्रबोधिनी शेळगावच्या वतीने जिल्हास्तरीय खो-खो व मैदानी खेळांचे निवासी उन्हाळी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: ग्रामीण भागात जे. के. क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातूनच जो खेळांचा प्रसार व प्रचार होतो .तो मुलांच्या भविष्यासाठी खूप सकारात्मक
असल्याचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जे. के. क्रीडा प्रबोधिनी शेळगाव आयोजित इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय खो-खो व मैदानी खेळांचे निवासी उन्हाळी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर दि. १७ एप्रिल ते २७ एप्रिल या दहा दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा दिनांक २७ एप्रिल रोजी संपन्न झाला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले .
तसेच हर्षवर्धन पाटील म्हणाले की पंतप्रधानांच्या ' खेलो इंडिया ' या संकल्पनेतून खेळाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. यामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळातून प्राविण्य मिळवलेला खेळाडू सरकारी नोकरीसाठी पात्र होणार आहे. क्रीडा स्पर्धासाठी क्रीडा मैदान निर्मितीसाठी अनुदान योजना सरकारतर्फे सुरू करण्यात आली असून आपल्या तालुक्याला प्राधान्याने निधीसाठी प्रयत्न करणार आहे. जे.के. क्रीडा प्रबोधनीच्या इमारतीचे भूमिपूजन करून तेथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले तसेच पुढील वर्षी १० दिवस ऐवजी १ महिन्याचे खेळाचे प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी व त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी भागवत भुजबळ,ग्रा. पं.सदस्य तानाजी ननवरे,
प्रगतशील बागायतदार मोहन दुधाळ, कर्मयोगी चे संचालक राहुल जाधव व अंबादास शिंगाडे,
प्रशांत भुजबळ , पोलीस पाटील उषा वाघमोडे,माजी संचालकशिवाजी शिंगाडे, दलीत पँथरचे
रमेशभाई पारधे, रामभाऊ ठोंबरे,लक्ष्मण पवार सर,प्राचार्य शाहू हायस्कूल बंडू पवार सर,क्रीडा अधिकारीमहेश चावले ,मेजर उमेश पारधे, युवा नेते शुभम शिंगाडे, व्हा. चेअरमन उमेश ननवरे,रतन ननवरे,बापूराव वाघमोडे,प्रगतशील बागायतदार मोहन खराडे,संदीप जाधव,बँक अधिकारी नितीन जाधव इत्यादी उपस्थित होते.
हे शिबिराचे आयोजन गेली ६ वर्षापासून शेळगाव येथे होत असून शिबिराच्या माध्यमातून जिल्हास्तरीय चाचणीसाठी १४० विद्यार्थी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय निवडीसाठी पात्र आहेत. १० खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून पात्र आहेत. १० खेळाडू आर्मी व पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. या शिबिरामध्ये फक्त खेळच नव्हे तर गायन, वादन, भाषण, कला, चित्रकला, महापुरुषांचे चरित्र चे व्याख्यान, सामाजिक संस्कार ,व्याख्यान, आरोग्य व आहार मार्गदर्शन, करियर मार्गदर्शन अशा सर्वांगीण विकासासाठी खेळाडूंची तयारी करून घेतली जाते.
या कार्यक्रमाचे आयोजन जे. के. क्रीडा प्रबोधिनी चे संस्थापक कैलास जाधव,युवा नेते महेश खराडे,विठ्ठलराव ननवरे,उमेश सूपुते,रतन ननवरे , बबलू निंबाळकर, ह. भ. प. अनिल महाराज जाधव,परशुराम मोहिते यांनी केले.
या शिबिर प्रशिक्षणासाठी मेजर उमेश पारधे यांनी खेळाडूंना दहा दिवस आर्मी संचलनाची प्रशिक्षण देऊन विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुराम मोहिते यांनी केले तर आभार मोहनराव दुधाळ मानले.

