shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रविवारी पुण्यात,बँक आँफ महाराष्ट्रकर्मचारी संघाचे भव्य महाअधिवेशन

लियाकतखान पठाण - संगमनेर
रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी पुण्यात गोवर्धन मंगल कार्यालय शनिवार पेठ याठिकाणी  
बँक आँफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे भव्य त्र्येवार्षिक महाअधिवेशन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या त्रेवार्षीक अधिवेशनाचे उद्घाटन श्री मनमोहन दास (सेक्रेटरी एन ओ बी डब्ल्यु) यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष गदादे (जनरल सेक्रेटरी,बो.मो.) व श्री मोहन येणुरे (जनरल सेक्रेटरी भारतीय मजदुर संघ महाराष्ट्र) हे उपस्थित रहाणार आहे.
 या अधिवेशनात बँकिंग क्षेत्रातील विविध विषयावर सध्या जागतीक व राष्ट्रीय पातळीवर बँकिंग उद्योगात परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले आहे, विदेशातील अनेक मोठ्या बँकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झालेली आहे, या उलट भारतीय बँकिंग उद्योग एका महत्वपूर्ण कालखंडातून संक्रमण करीत असल्याने संबंधित सर्व स्तरावर एक फार मोठे अनिश्चितेचे वातावरण पाहावयास मिळत आहे, सध्या भारतात खाजगी बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका व सहकारी बँका यामध्ये तीव्र स्पर्धा चालू आहे, या अधिवेशनात बँकिंग उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या खालील प्रश्नावर चर्चा होऊन पुढील ध्यैय - धोरणे ठरवले जाणार आहे. बारावा द्विपक्षीये करार, पाच दिवसांचा आठवडा, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन अपडेशन व फॅमिली पेन्शन अपडेशन करणे सर्व स्तरावर पुरेशी नोकर भरती बॅलन्स ठेवणे, बँकिंग उद्योगातील आऊटसोर्चींग ठेकेदार पद्धत बंद करणे तसेच मुक्त चिंतनाद्वारे महिला कर्मचाऱ्यांचे व अपंग कर्मचाऱ्यांचे, माजी सैनिक कर्मचाऱ्यांचे सध्याच्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे, तरी सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या अधिवेशनात बँकिंग उद्योगातील संपूर्ण भारतीय सर्व सदस्यांनी सहभागी होण्याची आव्हान अध्यक्ष श्री दिनेश कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close