इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांपैकी बिनविरोध झालेल्या ४ जागा वगळता उर्वरित १४ जागांसाठी आज मतदान सुरू.
१० गावांमध्ये २० मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजल्यापासून मतदानास सुरुवात .
जंक्शन येथील मतदान केंद्रावर आमदार दत्तात्रय भरणे बजावला मतदानाचा हक्क .
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी गावामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्र क्रमांक वर २/१ व २/२ असून या केंद्रावरती सकाळी ८ वाजता मतदान पेट्यांचे पूजन करून मतदानास सुरुवात करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक च्या दरम्यान जंक्शन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना आमदार दत्तात्रय भरणे.
वडापुरी केंद्रामध्ये कृषी पतसंस्था मतदार संघातून ३८० मतदार मतदान करणार असून ग्रामपंचायत मतदार संघातून १३१ मतदार मतदान करणार आहेत.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची साठी १८ जागांपैकी बिनविरोध झालेल्या ४ जागा वगळता उर्वरित १४ जागांसाठी आज शुक्रवार (ता.२८) रोजी मतदान संपन्न होत आहे. ही मतदान प्रक्रिया १० गावांमध्ये २० मतदान केंद्रावर पार पडत आहे .सकाळी ८ वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान पेट्या पूजन प्रत्यक्ष मतदानास सुरुवात करण्यात आली आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेपैकी अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी आ.यशवंत विठ्ठल माने, व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागेसाठी दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा व हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेसाठी सुभाष ज्ञानदेव दिवसे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
तर उर्वरित १४ जागांसाठी दोन पॅनल व काही अपक्ष असे एकूण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.यामध्ये गेली आठवडाभर शेतकरी विकास पॅनल व स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल या दोन्हीही पॅनलच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांचा फेरी झाडत प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. यामुळे आज होणाऱ्या मतदानातून मतदार राजा कोणाच्या पाठीमागे हे शनिवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
-
४ हजार ३२२ मतदार
इंदापूर बाजार समितीसाठी एकूण ४ हजार ३२२ मतदार मतदानासाठी पात्र असून यामध्ये २५० सोसायट्यांचे सोसायटी मतदारसंघातून ३ हजार १३१ मतदार, तर ११६ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत मतदार संघातून १ हजार १९१ मतदार आहेत.
-
१० मतदान केंद्रे
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात १० ठिकाणी २० मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये इंदापूर,वडापुरी,बावडा,निमगाव केतकी, शेळगाव, जंक्शन, सणसर, कुरवली, पळसदेव भिगवन या मतदान केंद्रांचा समावेश आहे.
-
१२० कर्मचारी व ४० पोलिसांचा चोख बंदोबस्त
इंदापूर बाजार समितीच्या निवडणूक मतदानासाठी एकूण २० केंद्रांवर १२० कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात आले असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ४० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

