shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*या देशातील लाखो कोटी लोकांना आपला वाटणारा 'मन की बात' हा कार्यक्रम- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

*या देशातील लाखो कोटी लोकांना आपला वाटणारा 'मन की बात' हा कार्यक्रम- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

   -  इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत १०० वा ' मन की बात ' या कार्यक्रमाचे आयोजन.
   इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर १०० वा 'मन की बात ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की ऑक्टोबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केला आज 100 वा भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून विविध विषयावर जनतेशी सुसंवाद साधला. हा कार्यक्रम देशातील प्रत्येकाला आपला वाटणारा कार्यक्रम असून या माध्यमातून लाखो कोटी लोक जोडले गेले आहेत.
    इंदापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक , शक्ती केंद्रप्रमुख , बुथप्रमुख यांनी यामध्ये सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आत्मसात केला.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी विविध विषयावर सुसंवाद , विविध सामाजिक प्रश्नाबाबत लोकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन मन की बातच्या माध्यमातून सुसंवाद साधत आहेत.देशातील लाखो कोटी लोकांना हा कार्यक्रम आपला वाटणारा ठरला आहे.
  इंदापूर शहराची विकास कामे आपल्या माध्यमातून होत आहेत मात्र विरोधक याचे श्रेयवाद घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत.
    भारतीय जनता पक्ष इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
    यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे , उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, नगरसेवक कैलास कदम, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे ,रघुनाथ राऊत,नाना पाटील, अशोक खेडकर ,सागर गानबोटे , ललेंद्र शिंदे , संतोष देवकर , मच्छिंद्र शेटे ,अविनाश कोथमीरे उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर आभार माजी नगरसेवक गोरख शिंदे यांनी मानले.
close