shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

*भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.*

*संचालक राहुल सवणेंच्या हस्ते ध्वजारोहण.*
*इंदापूर* : ( दि.१) - येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. 
यावेळी जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुध्दांच्या मूर्तीस व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरें  (तात्या) यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ध्वजारोहण संस्थेचे संचालक राहुल सवणें यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमास इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला मखरे (काकी) ,उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे , मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे व सर्व शिक्षक,प्राध्यापक,अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप  
यांनी केले.तर मान्यवरांचे आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.
close