shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फुले जयंतीनिमित्त "रक्तदान शिबिराचे"आयोजन - "रक्तदान शिबिरास" उस्फूर्त प्रतिसाद!


"दापोडी, पुणे येथील श्रीमती सी. के.गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त "रक्तदान शिबिराचे"आयोजन - "रक्तदान शिबिरास" उस्फूर्त प्रतिसाद!
       मंगळवार दिनांक ११ एप्रिल 2023 रोजी सकाळी ९:०० ते १२:३० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये "रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

       पुणे येथील आर .जी .घोलप मेमोरियल ब्लड बँक आणि गोयल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग, एन.सी.सी. विभाग, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
       रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या सर्व स्टाफ, विद्यार्थी, ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
      उद्घाटन प्रसंगी घोलप मेमोरियल ब्लड बँकेचे प्रमुख श्री.रोहिदास घोलप यांनी उपस्थित रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व व रक्तदान कोण करू शकतो, रक्तदानाचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले.
        महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी विद्यार्थ्यांना रक्तदानासंदर्भात शुभेच्छा दिल्या!
     उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रा. प्रितेश पठारे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले.
      रक्तदान शिबिरासाठी एकूण १२५ विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची "हिमोग्लोबिन तपासणी" करण्यात आली. एकूण विद्यार्थ्यांमधून पात्र २५-३० विद्यार्थ्यां/प्राध्यापक यांनी रक्तदान केले.
        रक्तदान साठी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि प्रत्यक्ष रक्तदान करणाऱ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देण्यात आला.

        प्रमुख रक्तदात्यांमध्ये सुनील राठोड,मंदार गावडे, अजय कापसे, विशाल वाघमारे, नरेंद्र कांबळे, ईश्वर साळुंखे, समय मराठे, अनिकेत चोपडे, अमित कांबळे, रोहित गोडबोले, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा परबतराव बैसाणे, डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी उत्साहाने रक्तदान करून इतरांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. परबतराव बैसाणे, प्रा.सिद्धार्थ कांबळे, प्रा.वैभव डावखर, प्रा.महेंद्र शिंदे, प्रा.दिपाली खरडे, प्रा. वैभव गोरड यांनी केले.
        डॉ.सोमनाथ दडस, डॉ. शोभा शिंदे, डॉ. पौर्णिमा कोल्हे,प्रा. वैभव वरडुले, प्रा. अनिता बांबळे, प्रा.प्रियांका शिंदे, प्रा.प्रियांका पवार, प्रा राजेंद्र नेरकर, यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाची सांगता "वंदे मातरम"! गीताने झाली.
close