shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हद्दपार आरोपी पोलिसांनी केला गजाआड

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

  प्रतिनिधी : महेश चव्हाण

नगर : ११ /  एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील असणारा  आरोपी दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्हयातुन एमआयडीसी
पोलिसांनी दोन वर्षाकरीता  हददपार करण्यात आला आहे .

आरोपी  सागर दिलीप गायकवाड रा. निंबळक ता. जि. अहमदनगर याचे विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे व शहरात विविध गुन्हे दाखल आहेत .

 मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे वतीने मा. उपविभागीय अधिकारी सो नगर भाग अहमदनगर यांना आरोपी सागर दिलीप गायकवाड यास दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्हा स्थळ हददीतुन हददपार करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी सो नगर भाग अहमदनगर यांचेकडील हददपार प्रस्ताव क्र. २६ / २०२२ दि. २८/०३/२०२३ अन्वये आरोपी सागर दिलीप गायकवाड यास अहमदनगर जिल्हयाचे स्थळसिमेचे हददीतुन दोन वर्षाकरीता हृददपार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आरोपीस शिरुर पोलीस स्टेशन हददीत सोडण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. अजित पाटील सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप सो. प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोस्टे, पोहेकॉ समीर सय्यद, पोना साबीर शेख, पोना राहुल शिंदे, पोशि राजेश राठोड, पोशि सुरज देशमुख, पोकों/किशोर जाधव, पोकॉ सचिन हरदास, यांचे पथकाने केलेली आहे.
close