shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अहमदनगर यांच्या प्रयत्नांना यश

शिर्डीः (नानासाहेब शिंदे):-
    
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असते त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेमध्ये कामगारांना घरबांधणी करिता अर्थसहाय्य केले जाते.

 कामगार मंत्री सुरेश खाडे यांना शिर्डी येथे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी नानासाहेब शिंदे,जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण व जिल्हा सरचिटणीस निवृत्ती जावळे व भाजपा नेवासा शहर अध्यक्ष मनोज  पारखे यांनी बांधकाम कामगारांचे घरकुल तातडीने सुरू करण्याकरिता निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत कामगार मंत्री यांनी तात्काळ घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजुरी करिता पाठवण्याचे आदेश दिले व त्याचे फलित म्हणून आज नेवासा तालुक्यातील बारा कामगारांचे घरकुलचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठवण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहिसाठी स्थळ पाहणी करून अहवाल मागवले असून नेवासा तालुक्यातील कामगारांच्या जागेची पाहणी झाली आहे. लवकरच कामगारांचे घरकुलाचे काम सुरू होईल यासाठी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,  भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी नानासाहेब शिंदे, आ. बाळासाहेब मुरकुटे व भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांचे विशेष सहकार्य लाभले असून पुढील काळात अशाचप्रकारे नेवासा तालुक्यातील बांधकाम मजुरांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे  भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी नानासाहेब शिंदे भाजपा जिल्हा सरचिटणीस निवृत्ती जावळे यांनी सांगितले.
close