स्वाभिमानी शेतकरी पॅनल च्या प्रचाराचा नारळ व्याहाळीत वाढवून, प्रचाराला प्रारंभ.
इंदापूर प्रतिनिधी. :- इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी पॅनल च्या प्रचाराचा नारळ व्याहाळी येथील भैरवनाथ मंदिरात वाढवून सुभारंभ करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी पॅनल च्या प्रचाराची सुरुवात व्याहळी गावातून करण्यात आली, या वेळी पॅनल प्रमुख महारुद्र पाटील बोलताना म्हणाले की,
आमचा पॅनल कै.शंकरराव पाटील, कै. राजेंद्रकुमार घोलप, कै.गणपतराव पाटील,कै.महादेव बोडके,
यांच्या विचारांवर चालनारा पॅनेल आहे, जनता सुज्ञ आहे,आमच्या पॅनेलला मत म्हणजे विकासाला मत, दमदाटीचे राजकारण खपऊन घेणार नाही, जशाचतस उत्तर देऊ,हुकूम शाही चालणारच नाही, असे पाटील म्हणाले, या कार्यक्रमास पॅनल प्रमुख जेष्ठ नेते अशोकराव घोगरे,महारूद्र पाटील, डॉ.शशिकांत तरंगे, तुकाराम करे,किरण गोफणे, यांची भाषणे झाली.
यावेळी, वसंतराव आरडे,शिवाजीराव इजगुडे,किसनराव जावळे, सुयोग पाटील, दामोदर पवार,आप्पा माने,दुर्वास शेवाळे, छगनराव तांबिले,बबनराव खराडे,
यांच्यासह सर्व उमेदवारासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब माने यांनी केले तर आभार दादा थोरात यांनी मानले,

