मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे मोफत वाटप
रोहित प्रिंटींग प्रेसचा सामजिक उपक्रम : ८० विद्यार्थ्यांना मिळाला लाभ
इंदापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त, इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळा येथील ७० विद्यार्थ्यांना, संस्थेचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील रोहित प्रिंटींग प्रेसचे सर्वेसर्वा रोहित शिंदे यांच्या वतीने मोफत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
इंदापूर येथील समर्थ व्यायाम मंडळ संचालित मुकबधीर विद्यार्थ्यांची निवासी शाळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुक्रवार ( दि. १४ एप्रिल ) रोजी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रोहित प्रिंटिंग प्रेसचे वतीने मालक रोहित शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अमोल उन्हाळे यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सागर शिंदे म्हणाले की, आयुष्यात माणसाने यशाच्या शिखरावर जात असताना, सामजिक बांधिलकी जपत, समाजातील वंचित व दुर्बल घटकांना न्याय दिला पाहिजेत. त्यांना मदत केली पाहिजेत. आपल्या कमाईतील काही भाग दुर्बल घटकांसाठी खर्च केले पाहिजेत. त्यामध्ये मोठे समाधान लाभते. तसेच मुकबधीर शाळेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात मदत करण्यात येईल. अशी ग्वाही दिली.
यावेळी मूकबधिर निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अमोल उन्हाळे, शिक्षक तुकाराम डुकरे, शिवाजी शेळवणे, रमेश क्षीरसागर, गणेश जाधव, अंकुश चव्हाण, संजय कोल्हाळे, अभय उंबरदंड, रोहिणी जामदार, रोहिणी कौदारे, निशा चकोर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : इंदापूर येथील मुकबधीर निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करताना मान्यवर

