*जिल्हा परिषद शाळा म्हणजे विद्यार्थी सर्वांगीण विकासाचे केंद्र : विक्रम साळुंखे*
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १५/४/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथ शाळा गौराईमळा शेळगाव या ठिकाणी इयत्ता पहिली प्रवेशोत्सव ,इयत्ता चौथी निरोप समारंभ व सत्कार सोहळा संपन्न झाला.प्रथम भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसु्र्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.या कार्यक्रमासाठी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे साहय्यक पोलिस निरीक्षक माननिय साळुंखे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपल्या जीवनात जे संस्कार घडतात त्याचे माहेर घरच असते त्या ठिकाणीच आपल्या जीवनाचा पाया भक्कम होतो .अशा शाळेत विद्यार्थ्यांचा बौद्धीक, शारिरीक व मानसिक विकास घडवण्याचे कार्य अशा शाळेत घडत असते त्यामुळे इतर शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळुन आदर्श शाळा म्हणुन नावारुपाला येत आहेत.
या वेळी लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून शाळेच्या भौतिक सुविधा व झालेल्या कामाची रुपरेषा सांगण्यात आली .लोकसहभागातून गेटवरील कमान व शालेय भिंतीवरील रंगरंगोटीसाठी ७० हजार निधी जमा करण्यात आला होता .त्या मध्ये संतोषजी जाधव साहेब ए पी आय घाटकोपर ,अरुण जाधव सर,शेवंताताई भोसले , प्रियांका जाधव , प्रदिप खरात , तात्यासाहेब शिंगाडे ,दिपक शिंगाडे, विनोद नाझरकर यांच्या सहकार्यातुन वरील सर्व शालेय भौतिक सुविधांची कामे पुर्ण झाल्याने सर्व देणगीदारांचे पुस्तक व पुष्प गुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले . या वेळी संतोषजी जाधव साहेब यांनी आपल्या जीवनातील जिल्हा परिषद शाळेचे योगदान व महत्त्व सांगून सर्वश्रेष्ठ शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा होय असे सांगितले .सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
या वेळी इयत्ता चौथीतील मुलांनी ,पालकांनी ,केंद्र प्रमुख सुपुते साहेब , कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण जाधव सर व इतर ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच मंथन परिक्षेत उत्तीर्ण मुलांचा कंपास व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.इयत्ता पहिलीतील मुलांचा प्रवेश गणवेश, पाटी देऊन करण्यात आला सर्व सन्माननिय उपस्थितींना व मुलांना जेवणाची सोय करण्यात आली होती.या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक प्रताप शिरसट सरांनी केली.सुत्रसंचालन कडबनवाडी शाळेचे मुख्याध्यापक उमेश सुपूते सरांनी केले.
या कार्यक्रमावेळी शाळा व्य समिती अध्यक्ष विलास शिंगाडे, पोलिस हवालदार विनोद पवार साहेब,शेळगाव गावचे सरपंच रामदास शिंगाडे , शामराव जाधव ,अमोल जाधव ,पोपट शिंगाडे ,उमेश शिंगाडे ,मनिषा जाधव ,मनिषा शिंगाडे ,रंजना बनसोडे ,कविता शिरसट ,आशा होले ,रेश्मा जाधव, प्रियांका शिंगाडे ,अंबादास जाधव, विनोद जाधव ,प्रविण जाधव इतर बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली.

