shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांच्या मिरवणुकीतील भन्नाट डान्सला युवकांची उत्स्फूर्तपणे दाद!

राजवर्धन पाटील यांच्या मिरवणुकीतील भन्नाट डान्सला युवकांची उत्स्फूर्तपणे दाद!
इंदापूर : प्रतिनिधी दि.15/4/23
                       इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष, युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील महात्मा फुले जयंती मिरवणुकीतील भन्नाट डान्सला युवकांची उत्स्फूर्तपणे दाद मिळाली. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमेची मिरवणूक इंदापूर शहरातून शनिवारी (दि.15) रात्री काढण्यात आली.
         यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मिरवणूक सहभागी होत असताना, युवकांनी आग्रह करीत राजवर्धन पाटील यांना खांद्यावर उचलून घेतले. यावेळी गाण्यावरती राजवर्धन पाटील यांचा भन्नाट डान्स उपस्थितांना पहावयास मिळाला. यावेळी मिरवणुकीतील युवकांनी या भन्नाट डान्समध्ये सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
_.
close