जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुक्यात ८० गावात घोंगडी बैठक व शाखा उद्घाटन समारंभास आजपासून सुरुवात.
राज्याचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील डाळज नं.2 पासून घोंगडी बैठक व शाखा उद्घाटनास सुरुवात.
आज पासून ४ दिवस चालणार घोंगडी बैठका व शाखा उद्घाटन कार्यक्रम.
१९ एप्रिल रोजी शेटफळ हवेली येथे भव्य घोंगडी बैठक व सांगता समारंभाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: २०२३- २४ मध्ये महाराष्ट्रातील रामोशी, बेरड ,बेडर समाजाचा (सर्वे )जनगणना करून समाजाच्या संपूर्ण अडीअडचणी जाणून घेऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थिती इंदापूर तालुक्यात सुमारे ८० गावांमध्ये या संघटनेची गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ते तयार करणार असून दिनांक १६ एप्रिल २०२३ ते १९ एप्रिल २०२३ दरम्यान सुमारे ८० गावांमध्ये घोंगडी बैठक व शाखा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच १९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता शेटफळ हवेली तालुका इंदापूर येथे घोंगडी बैठक शाखा उद्घाटन दौऱ्याची भव्य सांगता सभा संपन्न होणार आहे. या सभेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे ,उपाध्यक्ष अंकुश जाधव सर, युवक अध्यक्ष सुधीर नाईक, संपर्कप्रमुख रोहित मदने, मुख्य प्रवक्ते विष्णू चव्हाण ,युवक उपाध्यक्ष किरण खोमणे, पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती इंदापूर तालुका अध्यक्ष कल्याण भंडलकर यांनी दिली.

