shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत -ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेघराज पाटील कुचेकर सत्ताधारी गटातून बाहेर .

*पळसदेव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत -ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेघराज पाटील कुचेकर  सत्ताधारी गटातून बाहेर .

उद्या सोमवारी दि.17 एप्रिल रोजी रिक्त असलेल्या सरपंच पदाची होणार निवडणूक.

इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक  सोमवार 17 एप्रिल रोजी पळसदेव ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.परंतु सत्ताधारी गटातील   गटबाजीमुळे सरपंच पदाच्या निवडणूकी मध्ये चुरस वाढली आहे.  पळसदेव गावचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मेघराज कुचेकर व माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या. सोनाली कुचेकर - पाटील यांनी  या  गटबाजीला कंटाळून  सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे   

त्याच बरोबर कुचेकर म्हणाले की,
आम्ही राष्ट्रवादीमध्येच  राहाणार व पक्षाचेच काम करणार  आहे. माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांची थोड्याच दिवसात भेट घेणार आहोत व  घेतलेल्या निर्णयाचे स्पष्ठीकरण देणार आहे .तसेच सोमवारी जो योग्य उमेद्वार फॉर्म भरेल त्या पैकी त्यातील योग्य उमेद्वाराला मतदान करणार असलेचे त्यानी माहिती देताना सांगीतले.
close