shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात संपन्न*

*गौराईमळा शाळेत महात्मा फुले जयंती  उत्साहात संपन्न*
          इंदापूर प्रतिनिधी :आज जिल्हा परिषद प्राथ शाळा गौराईमळा शेळगाव या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रथम महात्मा  फुले यांच्या प्रतिमेचे  पुजन इयत्ता चौथीतील मुलींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक  प्रताप शिरसट सर यांनी प्रास्तविक करुन महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा सांगुन त्यांचा जीवनरथ सांगुन समाजात केलेल्या कार्यामुळे आज आपण मोफत शिक्षण घेत आहोत.तसेच मुलींच्या शिक्षणासाठी त्या काळी शैक्षणिक दरवाजे उघडण्यांचे महत्त्वाचे कार्य केले. या वेळी मुलामुलींची भाषणे  झाली.
        या वेळी अंगणवाडी मदतनीस कल्पना जाधव उपस्थितीत होत्या शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्याात आली
close