shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुलढाणा येथील पोलीसाला मारहाण करणारा जेरबंद


प्रतिनिधि : महेश चव्हाण

नगर : 11 /  बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश प्रल्हाद शिरेकर  हे दि . 28 मार्च 2023 रोजी शेंडी येथे त्यांचे कुटुंबीयांसोबत थांबले असताना अज्ञात दोन इसमानी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पायावर मोठा दगड टाकून गंभीर जखमी केले होते . त्यामधे त्यांचे दोन्ही पायांची हाडे फ्रॅक्चर झालेली होती.
या बाबत एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गु र न 254/23 भा द वि कलम 325,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .

सदर अज्ञात इसमाचा तपास सुरू असताना सदर इसम आरोपी नामे संकेत बाजीराव ससे हा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाले वरून त्यास पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे .

सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्षणाखली स पो नि राजेंद्र सानप, सपो नि योगेश चाहेर,पो ह .नंदकुमार सांगळे, पोका सुरेश सानप,पो का नवनाथ दहिफळे यांनी केलेली आहे.
close