प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : 11 / शेंडी येथील दि .06 मार्च 2023 रोजी शेंडी गावामधील विकास कार्यकारी सहकारी सोसायटी मधे चोरी झाली होती .त्याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गु र न 192/2023 ipc 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदरची चोरी ही आशिष नाना देठे रा. शेंडी व त्याच्या साथीदाराणी केल्याची तपासात निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेले इन्व्हर्टर , बॅटरी,MPS असा 16 हजार किमतीचा मुद्देमाल या अगोदर जप्त करण्यात आला आहे .सदर आरोपी आशिष नाना देठे यास 01 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती .
सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू होता सदर इतर दोन फरार आरोपी सागर गवाजी देठे,संदेश गवाजी देठे रा .शेंडी याना 10.04.23 रोजी ताब्यात घेऊन चोरीचा प्रिंटर आज दिनांक 11/04/23 रोजी जप्त करण्यात आले आहे
सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि राजेंद्र सानप , पोना गणेश कावरे, पोना संदीप आव्हाड, पोना दीपक गांगर्डे, यांनी केलेली आहे.

