shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ जयंती उत्साहात साजरी.

एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी
 : दिनांक ११ एप्रिल रोजी निमसाखर एज्युकेशन,सोसायटीचे एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर तसेच पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी सोमनाथ चौधर सर, प्रमोद चव्हाण सर ,,हणमंते सर व अनिता बर्गे मॅडम यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना उजाळा दिला. त्यावेळी विद्यालयातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले. आजिनाथ मलगुंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
close