shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी केलेले कार्य नेहमीच समाज हितासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रेरणादायी ठरते - अनिताताई खरात.

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी  केलेले कार्य  नेहमीच समाज हितासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रेरणादायी ठरते - अनिताताई खरात.

तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्ष अनिताताई खरात यांनी       महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार  अर्पण करून केले अभिवादन.



इंदापूर प्रतिनिधी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले  यांच्या १९६ वा जयंती निमीत्त  तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्र अध्यक्षा अनिताताई खरात यांच्या   वतीने क्रांतीसुर्य  महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार  अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
यावेळी अनिताताई खरात यांनी अभिवादन करताना म्हटले की,  स्त्री शिक्षणाचा पाया रचत अस्पृश्यता व जातीभेदावरून आवाज उठवणारे शिक्षण सम्राट राष्ट्रपिता समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची  १९६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी केलेले कार्य  नेहमीच समाज हितासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे .अशा महामानवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
close