shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमद रजा सोशल फाउंडेशन इंदापूरच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न.

अहमद रजा सोशल फाउंडेशन इंदापूरच्या वतीने  रोजा इफ्तार पार्टी संपन्न.
इंदापूर : प्रतिनिधी

अहमद रजा सोशल फाउंडेशन इंदापूर च्या वतीने शुक्रवार (दि.७) शहरातील शेख मोहल्ला या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. 

   अहमद रजा सोशल फाउंडेशन च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोना काळात सर्व उद्योग,व्यवसाय ठप्प असताना अनेकांच्या उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता, अशा काळात सामाजिक जाणिवेतून शेकडो गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना किराणा किटचे वाटप तसेच ईदचा आनंदोत्सव इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे साजरा करता येत नाही. अशा कुटुंबांना ईद साजरी करता यावी म्हणून शीरखुर्मा किटच्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो.

 भविष्यात मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळा तसेच समाजातील गरीब व होतकरू तरुणांना शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे अहमद रजा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष वसीम शेख यांनी सांगितले.
     कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अहमद रजा सोशल फौंडेशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
close