shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पडस्थळ येथे आनंदाचा शिधावाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पडस्थळ येथे आनंदाचा शिधावाटप
इंदापूर प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये रेशन दुकानातून आनंदाचा शिधावाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला अनुसरून पडस्थळ ता. इंदापूर येथे आनंदाचा शिधावाटप करण्यात आले. १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो डाळ व १ किलो तेल या वस्तू शंभर रुपयांमध्ये प्रत्येक शिधाकार्ड धारकाला मिळत आहेत. पडस्थळ मध्ये 282 कुटुंबांना याचा लाभ होणार आहे . इंदापूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड,साने गुरुजी वि.का.सेवा सोसायटी पडस्थळचे चेअरमन भारत बोंगाणे, माजी सरपंच सुभाष बोंगाणे, महेंद्र रेडके, पोलीस पाटील गणेश राऊत, राजेंद्र बोंगाणे, रेशन दुकानदार आप्पाराव मारकड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त 'आनंदाचा शिधा' शिधापत्रिकाधारकांना वेळेत वितरित केल्याबद्दल पडस्थळ ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी पात्र लाभार्थी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच स्वस्त धान्य दुकानदार व पात्र लाभार्थी यांच्या समन्वयासाठी धान्य वितरण समिती  गठीत करण्यात आली.
close