इंदापूर तालुका माळी परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल रोजी निमगाव केतकी येथे भव्य जयंतीचे आयोजन...
इंदापूर तालुका माळी परिषदेच्या अध्यक्षपदी ॲड कृष्णाजी यादव यांची सर्वानुमते निवड.
सर्वाना सोबत घेवून समाज संघटन करून समाजातील समस्या प्राधान्याने सोडवणार - ॲड कृष्णाजी यादव
इंदापूर प्रतिनिधी : दि ५ संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे इंदापूर तालुका माळी परिषदेचे संस्थापक अध्यक्षपदी सर्वानुमते ॲड कृष्णाजी यादव यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सुचना अंकुश जाधव व यांनी मांडली. तात्यासाहेब वडापुरे यांनी सर्वाचे वतीने अनुमोदन दिले.
दि २६ मार्च रोजी इंदापूर तालुका माळी परिषदेची स्थापना करण्यात आली. उपस्थित असलेल्या समाज बांधवातून प्रतिनिधी निवड करण्यात आली होती. त्या प्रतिनिधी मधून अध्यक्षांची निवड करण्यात आली. ॲड कृष्णाजी यादव यांनी सांगितले की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सर्वाना सोबत घेऊन समाज्याचे हित , विकास , उन्नती , प्रगतीसाठी आग्रही राहू. समाजावर अन्याय होईल त्या वेळी खंबीरपणे माळी परिषद पाठीशी राहील.
यावेळी दि ११ एप्रिल रोजी निमगाव केतकी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती भव्य साजरी करण्यात येणार आहे. यावेळी विठ्ठल ननवरे , सर्जेराव जाधव , किरण म्हेत्रे , संतोष राजगुरू , अर्जून भोंग , सागर ढगे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले. आभार माणिक भोंग यांनी मानले.

