शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाराज )
सामाजिक बातमी
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत शॉप अँण्ड कमर्शिअल इस्तब्लिशमेंट झोन नं. २ प्रमाणे सुधारीत वेतन दरानुसार वेतन व त्यातील फरकांची रक्कम मिळणे बाबत.येणाऱ्या आठ दिवसात ही रक्कम मिळावे हे आदेश देण्यात यावे.
१) आउटसोर्स कर्मच्याऱ्यांना आपणा मार्फत देण्यात आलेल्या कायदेशीर नियम व अटी कंत्राटदारावर बंधनकारक असून देखील ESIG सुविधा , पगारी आठवडा सुट्टी याबाबत सर्व सुविधाचे कंत्राटदारामार्फत अद्याप देण्यात आलेले नाही तसेच
२) नगरपरिषद झोन नं. २मध्ये समावेश झाल्याने साईबाबा संस्थानचे शिर्डी येथील सर्व कर्मचाऱ्यांना दि. ०१.०५.२०२२पासून किमान वेतन अधिनियम १९४८अंतर्गत शॉप अण्ड कमर्शिअल ईस्टब्लिस्ट झोन नं. ०२ प्रमाणे वेतन देणे बंधन कारक आहे .
३) तसेच जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यानां झोन नं. ०२ प्रमाणे सुधारीत वेतन देण्यात येत नाही तोपर्यंत कंत्राट दारचे डिपॉझिट देण्यात येऊ नये यावेळी साईबाबा संस्थानला निवेदन देण्यात आले यावेळी प्रशांत वाघचौरे मनविसे शिर्डी शहर अध्यक्ष ,लक्ष्मण आण्णा कोतकर शिर्डी शहरअध्यक्ष ,राजेश लूटे जिल्हा उपस्थित होते.

