उर्सानिमित्त श्रीरामपूर मध्ये भव्य संदल मिरवणूक, कव्वाल्यांचा कार्यक्रम आणि महाप्रसाद (भंडारा) चे आयोजन*
श्रीरामपूर प्रतिनिधी:
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हजरत सैलानी बाबा दरबार यांचा जश्ने सैलानी उरूस शरीफ उद्या रविवार पासून सलग चार दिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
उद्या रविवार दि.३० एप्रिल रोजी हजरत सैलानी बाबा दरबार यांच्या उर्सानिमित्त भव्य संदल मिरवणूक सायंकाळी ४ वा. हजरत सैलानी बाबा दर्गाह पासून निघणार असून यावर्षीची संदल मिरवणूक खूप आगळ्या- वेगळ्या पद्धतीची असणार आहे. चाळीस फुटी ट्रॉलीवर मुंबईचा जगप्रसिद्ध ब्लू बॉईज बॅण्जो बॅन्ड सोबत बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ४० नगाडे असलेला वाद्यवृंद राहणार आहे. सदरची मिरवणूक मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे फिरुन पुन्हा सैलानी बाबा दरबार येथे येणार असून रात्री १० वाजता संदल चढविण्यात येणार आहे.
सोमवार दि. १ मे २०२३ रोजी सुप्रसिद्ध कव्वाल छोटा मजीद शोला व मंगळवार दि.२ मे २०२३ रोजी सुप्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. बुधवार दि. ३ मे २०२३ रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते ५ वाजे पर्यंत करण्यात आले आहे.
तरी सदरच्या सर्व कार्यक्रमास सर्व धर्मिय भाविकांनी उपस्थित राहुन हे.सैलानी बाबा दरबार संदल,उरूस व महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनही हजरत सैलानी बाबा उर्स कमिटी श्रीरामपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

