shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगांना निधी वाटप

पडस्थळ ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगांना निधी वाटप

इंदापूर प्रतिनिधी:  पडस्थळ येथे ग्रामपंचायतीची  मासिक मिटींग नुकतीच पार पडली. यामध्ये मागील प्रोसिडिंग वाचून विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच १५ व्या वित्त आयोगाचा आढावा घेण्यात आला. शासन नियमानुसार ठरवून दिलेल्या बाबीं वरती रक्कम खर्च करण्याचे ठरले. त्यानुसार १० टक्के दिंव्यांग निधीतून अपंगांना रोख रकमेचे चेक देण्यात आले. सभेचे अध्यक्षस्थान सरपंच वैशाली पांडुरंग मारकड यांनी भूषविले. सचिव म्हणून ग्रामसेवक महेश यादव यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच सपना राजेंद्र बोंगाणे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका गव्हाणे, रेश्माताई रेडके, आरोग्य सेविका वर्षा मुसळे याचबरोबर पांडुरंग मारकड, सुभाष बोंगाणे, राजेंद्र बोंगाणे, गणेश गव्हाणे, गोकुळ कोळेकर, चंद्रकांत बोंगाणे, अर्जुन रेडके, महेंद्र रेडके, ग्रा.पं. कर्मचारी खंडेराव कोकरे, इतर ग्रामस्थ व अपंग लाभार्थी उपस्थित होते. उर्वरित अपंग लाभार्थ्यांना देखील पुढच्या वेळेस लाभ देण्यात येणार आहे. आपल्या हक्काचा निधी मिळाल्यामुळे अपंग लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. जि.प.प्राथमीक  शाळेच्या रंग कामासाठी देखील ग्रामपंचायत मधून निधीची तरतूद करण्यात आली. गावामध्ये जर आणखी कोणी अपंग बांधव या लाभापासून वंचित असतील तर ग्रामपंचायतीची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
close