shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुई ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड बिनविरोध..

रुई ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड बिनविरोध..

रुईमध्ये सरपंच उपसरपंच पदी महिला.

इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यामध्ये तिर्थक्षेत्र बाबीर मुळे प्रसिद्ध असलेल्या  रुई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. 
पुर्वीचे उपसरपंच अनिल कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी मारकड यांचा एकमेव अर्ज आला होता . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक सोमनाथ पवार यांनी काम पाहिले तर  सरपंच कृष्णाबाई तात्या कचरे यांनी मारकड यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. विद्यमान सरपंच महिला व उपसरंचपदी मारकड यांचे निवडीनंतर खऱ्या अर्थाने  महिलांना न्याय देऊन महिलाराज आल्याची प्रतिक्रिया मा. सरपंच मिरादेवी पाटील यांनी दिली . निवडीनंतर रुई गावात गुलालाची उधळण करूण जल्लोष केला. यावेळी मा. सरपंच यशवंत कचरे , अजितसिंह पाटील, गोपाळ भोसले , बापु लावंड,साहेबराव लावंड डाॅ संभाजी मारकड,मगन मराडे,अनिल कांबळे यांचेसह सदस्य व पद्माकर लावंड,अंकुश लावंड, अमरसिंह पाटील, उदयसिंह पाटील,सतीश झेंडे,रवी शिंदे,विजय मारकड, तानाजी मारकड , दिपक मारकड उपस्थित होते. निवडीनंतर सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ  माने यांनी सन्मान केला.  यावेळी मारकड यांनी मा.सभापती प्रविण  माने यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीन विकासासाठी कायम प्रयत्नशील कटिबद्ध राहुन महिला सक्षमीकरण करूण जास्तीत जास्त महिलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 
तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात यांनी निवडी नंतर सुप्रिया मारकड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
close