डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे भिमउत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन .
सुप्रसिद्ध गायक प्रविणकुमार यांचा भिमबुद्धगीतांचा सदाबहार कार्यक्रमाचे उदघाटन मा.नगरसेवक श्रीधर बाब्रससह इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे भिमउत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बुधवार दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील सुप्रसिद्ध गायक प्रविणकुमार यांचा भिमबुद्धगीतांचा सदाबहार कार्यक्रमाचे उदघाटन मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, प्रा.अशोक मखरे सर, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब सरवदे, श्री गारदी रावसाहेब, दिलीप शिंदे, शिवसेना नेते ज्ञानेश्वर चौगुले इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या कार्यक्रमाचे आयोजन आनंद मखरे, शुभम मखरे व सर्व समिती यांनी केले.

